नवी दिल्ली: कोरोनाच्या दैनिक रुग्णांमध्ये घट झाली असून, गेल्या 24 तासात 20,036 नवे कोरोना रुग्ण समोर आले आहेत.
गुरुवारच्या तुलनेत रिपोर्ट करण्यात आलेल्या रुग्णांच्या संख्येत कमी आली आहे. काल संक्रमणाचे 21,822 नवे रुग्ण समोर आले होते. तर, संक्रमणमुक्त रुग्णांची संख्या वाढून 98 लाखावर पोचली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, गेल्या 24 तासात कोरोनाचे 20,036 नवे रुग्ण आढळले आहेत. याप्रमाणे देशामध्ये संक्रमितांची संख्या वाढून 1,02,86,710 झाली आहे. दरम्यान, 256 लोकांनी संक्रमणामुळे आपला जिव गमावला आहे. यानंतर कोरोना मृतांची संख्या वाढून 1,48,944 झाली आहे.
मंत्रालयाच्या आकड्यांनुसार, देशामध्ये संक्रमणमुक्त रुग्णांची संख्या वाढून 98,83,461 झाली आहे. गेल्या 24 तासात 23,181 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.