पुणे :
सांगली जिल्ह्यातील मिरज परिसरातील एका सहकारी साखर कारखान्याच्या क्षेत्र कार्यालयात सोमवारी पहाटे अचानक आग लागल्याची माहिती पोलिसांनी दिली.
सांगलीचे पोलिस अधिक्षक गेडाम दिक्षित यांनी सांगितले की, ही आग राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या फिल्ड ऑफिसमध्ये लागली असून या आगीत काही फाईल्स जळाल्या आहेत.
कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक आरडी माहुली यांनी सांगितले की, कार्यालय सावळवाडी येथे आहे आणि ही आग अपघाताने लागली आहे की नाही हे जाणून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
आम्ही अद्याप पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली नसल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, शेतकरी संघटनेच्या सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दावा केला की, उसाची एकरकमी एफआरपी न मिळाल्याने नाराज झालेल्या काही शेतकर्यांनी ही आग लावली आहे.