नैरोबी : चीनी मंडी
येत्या सहा महिन्यांत ज्या साखर कारखान्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होत नाही. ते कारखाने थेट बंद केले जातील, असा निर्णय केनियाच्या कृषी विभागाचे कॅबिनेट सचिव मवांगी कैन्जुरी यांनी जाहीर केला आहे. बुनगोमा येतील नझोए साखर कारखान्याला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, ‘साखर कारखान्यांचे व्यवस्थापन समाधानकारक काम करत नसल्याचे दिसत आहे. गैरव्यवस्थापनामुळे साखर कारखाने डबघाईला आले आहेत. ज्यांनी कारखाना चालवण्याचे आव्हान स्वीकारले आहे, ते स्वतः धोका पत्करून ते करत आहेत.’ येत्या सहा महिन्यात जो साखर कारखाना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत नाही. तो बंद केला जाईल. जर, कारखान्याचे नेतृत्व कमी पडत असेल, तर आम्ही व्यवस्थापन मंडळ बरखास्त करू, असे कैन्जुरी यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, ‘मंत्रालयाच्या लेखापालांची एक टीम नझोए साखर कारखान्याचे आणि इतर कारखान्याचे लेखापरिक्षण करण्यासाठी पाठवण्यात आली आहे.’
सरकार कोणत्याही बोगस कामागारांना, पुरवठादाराला किंवा एकदा काराखान्याला ऊस पाठवलेल्या शेतकऱ्याला पैसे देणार नाही. गरजू शेतकऱ्यालाच सरकार मदत करेल, ज्याची थकबाकी कारखान्याकडे आहे. त्याला कारखान्यानेच पैसे द्यायचे आहे. सरकार यासाठी बिनचूक याद्या तयार करण्याचे काम करत असल्याचे कैन्जुरी यांनी स्पष्ट केले.