कर्नाटक: इथेनॉल उत्पादन, वापर वाढविण्याचे केंद्रीय गृहमंत्री शहा यांचे आवाहन

बागलकोट: आपल्या देशात पेट्रोल आणि डिझेलच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च होते. याऐवजी इथेनॉलचा उपयोग वाढवायला हवा. हे बहूआयामी उत्पादन शेतकऱ्यांनाही मदतीचे ठरेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

बागलकोट येथे शेतकऱ्यांना उपयुक्त अशा विविध योजनांचे उद्घाटन करताना ते बोलत होते. केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांसाठी विविध कल्याणकारी योजनांचीही त्यांनी माहिती दिली.

यावेळी ऊसापासून निर्माण होणाऱ्या इथेनॉल या उपपदार्थाच्या वापरावर त्यांनी भर दिला. केंद्रीय गृहमंत्री शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इथेनॉल उत्पादन आणि त्याच्या वापराच्या क्षेत्रासाठी दिशादर्शक काम केले आहे. ही एक बहूआयामी योजना आहे.

एका बाजूला इथेनॉलच्या उत्पादनातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल तर दुसरीकडे साखर कारखान्यांनाही यापासून फायदा मिळेल. पेट्रोलमध्ये याच्या वापरातून देशातील परकीय चलनाची बचतही होऊ शकेल. या माध्यमातून देशाचा विकास आणि आत्मनिर्भरतेला बळ मिळेल.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले, पंतप्रधान मोदी यांनी पूर्ण देशभरात इथेनॉलच्या उत्पादनासाठी काही निर्णय घेऊन उपाययोजना केल्या आहेत. जेव्हा आम्ही सत्तेमध्ये आलो तेव्हा केवळ १.५८ टक्के मिश्रण (पेट्रोलियम पदार्थांमध्ये इथेनॉल वापर) वापरले जात होते. मात्र मोदी सरकारने २०२२ पर्यंत १० टक्क्यांपर्यंत मिश्रण वापरले जाईल यासाठी आराखडा तयार केला आहे. २०२५ पर्यंत याचा वापर ३० टक्क्यांपर्यंत नेण्याचे आमचे प्रयत्न आहेत. यातून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळू शकतील.

ग्रामीण भागात यातून रोजगार निर्मिती होईल आणि हे पर्यावरणपूरकही ठरेल. एमआरएन समुहाद्वारे शेतकऱ्यांना उपयुक्त योजनांमधून ४०००० शेतकरी कुटूंबांना मदत मिळू शकेल. या क्षेत्रात नवे सहा हजार रोजगार निर्माण होतील. हे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here