कोईमतूर: जिल्ह्यातील ऊस लागवडीत घट

कोईमतूर : तमीळनाडूमधील काही जिल्ह्यांमध्ये ऊस लागवडीत घट दिसू लागली आहेत. कोईमतूर जिल्ह्याचे उदाहरण पाहिले तर २०१७ नंतर जिल्ह्यात ऊस शेतीत सुधारणा झालेली नाही. २०१६ मधील दु्ष्काळानंतर येथील ऊस लागवड ५० टक्क्यांनी घटली आहे. पाण्याची आणि मजुरांची कमतरता, उत्पादनासाठी येणारा अधिक खर्च यामुळे शेतकऱ्यांनी ऊस शेतीपासून लांब राहणे पसंत केले आहे.

याबाबत कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात २०१६ मध्ये ७९२ हेक्टरमध्ये ऊस लागवड करण्यात आली होती. मात्र, दुष्काळामुळे २०१७ मध्ये शेतकऱ्यांनी केवळ ४०१ हेक्टरवर ऊस लागवड केली. त्यानंतर गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ४०० हेक्टर क्षेत्रात ऊस लावण करण्यात आली होती. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आयीएआर) ऊस उत्पादन संस्थेचे संचालक डॉ. राम बक्शी म्हणाले, ऊस लागवडीसाठी वार्षिक १५०० मिमी ते २०० मिमी पावसाची गरज असते. जिल्ह्यात काही वर्षांपर्यंत अत्यंत कमी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. शेतकऱ्यांना ऊस शेतीसाठी सोय नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. जिल्ह्यामध्ये साखर कारखाना नसल्याने ऊस शेतीला प्रोत्साहन देणे कठीण आहे. साखर कारखान्याला ऊस पाठवणे शक्य झाले तरच शेतकऱ्यांना अधिक लाभ मिळवता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here