गुवाहाटी : राज्य सरकारच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने चहा मळ्यात काम करणाऱ्या कामगाराच्या कुटूंबाला दरमहा दोन किलो साखर मोफत देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. अशा प्रकारची योजना लागू करण्याची तयारी यापूर्वीही करण्यात आली. मात्र, साखरेच्या खरेदीत अडचणी निर्माण झाल्याने त्याला सुरुवात झाली नाही.
चहा मळ्यातील कामगारांची चहासोबत मीठ खाण्याची सवय दूर करण्याच्या दृष्टीने ही योजना लागू करण्याच येणार आहे. या सवयीमुळे गर्भावस्थेत असलेल्या महिलांसाठी अडचणी निर्माण होतात. आसाम सरकारमधील अन्न व नागरी पुरवठा विभागाने संबंधित जिल्ल्ह्यांमध्ये उपायुक्त स्तरावर सूचना केल्या आहेत. चहा मळ्यात काम करणाऱ्या कुटूंबांना साखर पुरवठा करण्यासाठी बाजारातून साखरेची खरेदी करण्याबाबतच्या स्थितीची माहिती घ्यावी असे सांगण्यात आले आहे.