नवी दिल्ली : इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) दिलेल्या माहितीनुसार ३१ जानेवारी २०२१ अखेर देशातील ४९१ साखर कारखान्यांकडून गळीत हंगाम सुरू आहे. कारखान्यांनी आतापर्यंत १७६.८३ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ४४७ साखर कारखान्याद्वारे १४१.०४ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले होते. महाराष्ट्रात ३१ जानेवारी २०२१ अखेर साखरेचे उत्पादन ६३.८० लाख टन झाले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ३४.६४ लाख टनाचे उत्पादन झाले होते. यंदाच्या साखर हंगामात १८२ कारखाने सुरू आहेत. गेल्यावर्षी १४० कारखान्यांकडून साखरेचे गाळप करण्यात येत होते.
उत्तर प्रदेशमध्ये १२० साखर कारखाने सुरू आहेत. या कारखान्यांनी ३१ जानेवारीअखेर ५४.४३ लाख टन साखरेचे उत्पादन केले आहे. गेल्यावर्षी याचा कालावधीपर्यंत ११९ साखर कारखान्यांकडून ५३.९६ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले होते.
कर्नाटकमध्ये ३१ जानेवारीअखेर ६६ साखर कारखान्यांकडून ३४.३८ लाख टनाचे उत्पादन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ६३ साखर कारखाने सुरू होते. त्यांनी २७.९४ लाख टन साखरेची निर्मिती केली होती. गुतरातमध्ये ३१ जानेवारीअखेर ५.५५ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. गेल्यावर्षी ३१ जानेवारी २०२० पर्यंत ४.८७ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले होते. तमीळनाडू, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ३७ साखर कारखाने सुरू आहेत. ३१ जानेवारी २०२१ पर्यंत ३.५६ लाख टन साखरेचे उत्पादन करण्यात आले आहे. तर गेल्यावर्षीच्या हंगामात याच काळापर्यंत ३९ साखर कारखान्यांनी ४.३९ लाख टनाचे उत्पादन करण्यात आले होते.
उर्वरीत राज्यांतील बिहार, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि मध्य प्रदेश, छत्तीसगढ, राजस्थान, ओरीसामध्ये आतापर्यंत १५.११ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.