गोरखपूर: देशाच्या विकासात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. गेल्या सहा वर्षांपासून केंद्र सरकारने राबविलेल्या विविध योजनांमुळे शेतकरी आत्मनिर्भर होण्यास मदत झाली आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून गोरखपूरमधील चौरी चौरा घटनेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात जनतेशी संवाद साधला.
पंतप्रधान म्हणाले, कोरोना महामारीचे संकट असूनही कृषी क्षेत्रात वृद्धी झाली आहे. यात शेतकऱ्यांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांनी चौरा चौरी संघर्षात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने खूप काही केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांना मंडई उपलब्ध व्हावी यासाठी १००० जादा मंडयांना राष्ट्रीय कृषी बाजाराशी जोडले जाईल. देशाची एकता टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्राधान्य दिले पाहिजे. या भावनेतून सर्वांनी देशांसोबत पुढे आले पाहिजे.
पंतप्रधान म्हणाले, यावर्षीच्या अर्थसंकल्पाने देशाच्या विकासाला गती मिळणार आहे. जगातील अनेक देश आपल्या कोरोना विरोधी लसीकरण मोहीमेचा आदर्श घेत आहेत. आम्ही गावांमध्ये आरोग्य सुविधा पोहोचविण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे लोकांना उपचारासाठी शहरांमध्ये जावे लागणार नाही.