उडूपी : दक्षिण कर्नाटकातील शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आधार असलेल्या ब्रह्मवार सहकारी साखर कारखान्याच्या नव्या प्रशासनाने शेतकऱ्यांकडून ऊस खरेदी करून शुद्ध सेंद्रीय गुळाचे उत्पादन सुरू केले आहे. हा गूळ विक्रीसाठी उपलब्ध आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या या गूळ उत्पादन केंद्राबाबत जनतेकडून चांगली प्रतिसाद मिळत आहे.
येथील गुळाचे उत्पादन करताना कोणत्याही रसायनांचा वापर केलेला नाही. याशिवाय गुळाचे थेट ग्राहकांपर्यंत वितरण केले जाते. ब्रह्मवार साखर कारखान्याच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष आणि संचालकांनी प्राथमिक स्तरापर्यंत पोहोचून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी चांगल्या दराने उसाची खरेची केली आणि १८ जानेवारी रोजी गूळ निर्मिती केंद्र तयार केले.
या कारखान्याची दैनंदिन ऊस गाळप क्षमता १५ टनाची आहे. सद्यस्थितीत येते दररोज ५ टन उसाचे गाळप केले जाते. त्यापासून ४५० किलो गुळाचे उत्पादन मिळते. ग्राहक येथून थेट सेंद्रीय गूळ खरेदी करतात. दिवसेंदिवस गुळाची मागणी वाढत आहे. कारखान्याने आदी मंड्या येथून चांगल्या प्रतिचे उसाचे बियाणे आणले. कारखान्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांना हे बियाणे वितरीत करण्यात आले. डिसेंबर २०१८ मध्ये बियाणे वितरण करण्यात आले. शेतकऱ्यांनी या वाणांची लागवड केली. मात्र, कारखाना सुरू झाला नाही. शेतकरीही उत्पादित ऊस विक्रीसाठी घेऊन आले नाहीत. त्यानंतर शनाडी आणि हुनसामेकी येथे ऊसाचे गाळप सुरू झाले. त्यानंतर शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.