बागपत : खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी लखनौमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सहकारी क्षेत्रातील बागपत साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याची मागणी केली. कारखान्याची गाळप क्षमता वाढवल्यास त्याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होईल असे त्यांनी सांगितले.
लखनौमध्ये मुख्यमंत्र्यांशी भेटीवेळी खासदार डॉ. सिंह यांनी जिल्ह्यातील विविध समस्यांविषयी चर्चा केली. मलकपूर, मोदीनगर आणि किनौनी साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे पैसे थकीत आहेत. हे पैसे तातडीने देण्यासंबंधीची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळणे गरजेचे आहे. त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे डॉ. सिंह यांनी सांगितले.
याशिवाय बागपत येथे बसस्थानकाच्या निर्मितीचे काम तातडीने करावे, दिल्लीपासून कासीमपूर खेडीपर्यंत रॅपीड रेल्वे अथवा मेट्रो सुविधा द्यावी, फुलेरा गावामध्ये पदवी शिक्षणासाठी कॉलेजची प्रलंबीत असलेली प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली. या कॉलेजचा फायदा परिसरातील तरुणाईला होईल असे त्यांनी सांगितले. बडोत येथील जनता वैदिक कॉलेजला कृषी विद्यापीठ बनविण्याच्या प्रस्तावास मंजुरी देण्याची मागणीही डॉ. सिंह यांनी केली. –