लाहौर : फैसलाबाद जिल्ह्यातील स्थानिक पोलिस ठाण्यात तंदलियावाला साखर कारखान्याच्याविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस खरेदी नोटीस (सीपीआर) दिल्यानंतरही वेळेवर उसाचे पैसे न दिल्याप्रकरणी एक गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर शेतकऱ्यांना सीपीआर न दिल्याप्रकरणी दुसरा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तंदलीयावाला साखर कारखान्याविरोधात केलेल्या तपासणीनंतर गेल्या आठवड्यात साखर आयुकत मुहम्मद जमान टैटू यांनी फैजाबाद येथील कंजवानी परिसरात तपासणी करून प्राथमिक तक्रार नोंदवली होती. ऊस व्यवस्थापक आतिफ सईद, मुख्य लेखापाल उमर अन्सारी, राणा अलीम यांच्यासह साखर कारखान्याच्या विविध कर्मचाऱ्यांविरोधात एफआयआरमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना उसाच्या थकीत रक्कमेची भरपाई न केल्याचा आरोप एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.
याबाबत ऊस आयुक्त मुहम्मद जमान टैटू यांनी सांगितले की, चुकीच्या पद्धतीने केलेल्या प्रत्येक प्रकरणावर कारवाई केली जाईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कष्टाचे पैसे देण्यास आडकाठी करणाऱ्यांविरोधात कडक भूमिका घेतली जाईल.