दक्षिण आफ्रिका: साखरेच्या मास्टरप्लॅन समर्थानाचे राष्ट्रपतींचे जनतेला आवाहन

केप टाउन : दक्षिण आफ्रिकेतील लोकांनी स्थानिक साखर उद्योगाचे समर्थन करावे आणि साखरेबाबत तयार करण्यात आलेला मास्टरप्लॅन लागू करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राष्ट्रपती सिरील रामाफोसा यांनी गुरुवारी केले. जनतेला संबोधित करताना राष्ट्रपती रामाफोसा यांनी सांगितले की, साखरेचा मास्टर प्लॅनवर लॉकडाउनच्या काळात स्वाक्षरी करण्यात आली आहे. यामध्ये साखरेच्या मोठ्या वापरकर्त्यांनी स्थानिक उत्पादकांकडून किमान ८० टक्के साखर खरेदी करणे अनिवार्य असल्याचे म्हटले आहे.

साखरेचा हा मास्टरप्लॅन लागू केल्यानंतर गेल्यावर्षी स्थानिक स्तरावरील साखरेच्या उत्पादनात वाढ आणि आयात करावयाच्या साखरेत घसरण दिसून आली होती. यामुळे साखर उद्योगाला स्थैर्य निर्माण होणार आहे. दक्षिण आफ्रिकेतील साखर उद्योगातून जवळपास ८५००० कामगारांना रोजगार मिळतो.

दक्षिण आफ्रिका केन ग्रोअर्स असोसिएशनने राष्ट्रपती रामाफोसा यांच्याकडे परस्पर सहकार्याची मागणी केली. व्यापार आणि उद्योग मंत्री अब्राहिम पटेल, कृषी आणि जमीन सुधारणा तसेच ग्रामीण विकास मंत्री थोको डिदिजा यांना साखर उद्योगासंबंधीच्या मास्टर प्लॅनसाठी ठरविण्यात आलेल्या उद्दीष्टांवर गतीने कार्यवाही करण्यासाठी सरकारने पाठबळ आणि सहाय्य द्यावे अशी मागणी असोसिएशनने केली आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये या मास्टर प्लॅनवर स्वाक्षरी करण्यात आली होती. यामध्ये साखर उद्योगाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सरकारसह दराविषयी सर्वांच्या हिताबाबत लक्ष देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here