बिजनौर : उसाच्या गोडव्याला सध्या लाल सड रोगाने घेरले आहे. जिल्ह्यातील प्रमुख वाण असलेल्या ०२३८ या उसाच्या प्रजातीवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. सुमारे १२५ हेक्टर क्षेत्राला याचा फटका बसला आहे. ऊस विभाग साखर कारखान्यांच्या सहकार्याने या रोगाची लक्षणे आणि उपाय योजना यांची माहिती शेतकऱ्यांना देत आहे. त्यासाठी गावागावात मेळावे आयोजित करण्यात येत आहेत.
ऊस हेच बिजनौर जिल्ह्याचे मुख्य पीक आहे. चांगल्या वाणांची निवड आणि तंत्रज्ञान यामुळे उसाचे उत्पादन वाढले आहे. ०२३८ हे उसाचे वाण चांगले पिकत असल्याने जिल्हा उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे. पण आता हे वाण लाल सड रोगाच्या विळख्यात सापडले आहे.
ऊसाचा हा भयंकर रोग आहे. त्याला कॅन्सर असेही म्हटले जाते. जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, ०२३८ प्रजातीचा ऊस लाल सड रोगाच्या प्रादुर्भावामुळे खराब होत आहे. जिल्ह्यातील सव्वाशे हेक्टर क्षेत्रावर सध्या हा योग आहे. बंदूकी विभागात ५२ हेक्टर, स्योहारामध्ये ४ हेक्टर, अफजलगढमध्ये २० तर धामापूरमध्ये ७४ हेक्टर क्षेत्रावर सध्या हा रोग आहे. मेळावे घेऊन, ग्रामस्थांच्या गाठीभेटी घेऊन रोगाची लक्षणे आणि उपाय योजना सांगितल्या जात आहेत. शेतकऱ्यांनी पिकांचे योग्य हंगाम ठेवावेत, लावणीपूर्वी बिजप्रक्रिया करावी असे सांगण्यात येत आहे. रोगग्रस्त बियाणे राखू नये, ज्या शेतात रोगग्रस्त ऊस असेल अशा ठिकाणी पिक बदल करण्यास सांगण्यात आले आहे असे सांगण्यात आले.