विमान प्रवास महागणार, सरकारने केली १०-३० टक्के वाढ

नवी दिल्ली : विमान प्रवास करताना आता प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. नागरिक वाहतूक मंत्रालयाने देशांतर्गत प्रवास भाड्याची मर्यादा १० ते ३० टक्के वाढवली आहे ‌ ही नवीन दर मर्यादा ३१ मार्च २०२१ अथवा पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील असे मंत्रालयाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे.

गेल्या वर्षी २१ मे रोजी देशांतर्गत विमान प्रवास सुरू करण्याची घोषणा करताना मंत्रालयाने उड्डाणाच्या कालावधीनुसार विविध सात बॅन्ड अनुसरून विमान प्रवासाचे भाडे निश्चित करण्यात आले होते.
या पद्धतीत पहिल्या बॅन्डमध्ये ४० मिनिटांपेक्षा कमी असलेली उड्डाणांचा समावेश होता. पहिल्या बॅन्डची किमान मर्यादा २००० रुपयांवरून २२०० रुपयावर आणली आहे. या बॅन्डची कमाल मर्यादा ७८०० रुपये करण्यात आली आहे. ती यापूर्वी ६००० रुपये होती‌.

यानंतरचे बॅंड ४०-६० मिनिट, ६०-८० मिनिट, ९०-१२० मिनिट, १२०-१५० मिनिट, १५०-१८० मिनिट आणि १८०-२१० मिनिट अवधीच्या उड्डाणांसाठी आहे.
गुरुवारी या बॅडसाठी मंत्रालयाने दिलेरी कमाल आणि किमान मर्यादा अशी : २८००-९८००, ३३००-११७००, ३९००-१३०००, ५०००-१६९००, ६१००-२०४००, ७२००-२४२०० रुपये आहे.
आतापर्यंत या बॅडसाठी कमाल, किमान मर्यादा अशी : २५००-७५००, ३०००-९०००, ३५००-१००००, ४५००-१३०००, ५५००-१५७०० आणि ६५००-१८६०० रुपये अशी आहे.

विमान नियामक डीजीसीएने गेल्या वर्षी २१ में रोजी म्हटले होते की प्रत्येक विमान कंपनीला किमान ४० टक्के तिकिटे कमाल आणि किमान बिंदूच्या मध्याला विकावी लागतील. कोरोना व्हायरस प्रकोपानंतर दोन महिन्यांहून बंद असलेली विमान सेवा २५ मेपासून सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here