नवी दिल्ली : भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील लसीकरण सुरू आहे. कोरोना महामारी विरोधातील ही लढाई भारत जिंकणार अशी स्थिती आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे नवे ११५४९ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या
१०९१६५८९ वर पोहोचली आहे.
दुसरीकडे गेल्या २४ तासांत कोरोनाने ९० जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १५५५५० झाली आहे.
कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढत आहे ही दिलासादायक बाब ठरली आहे. गेल्या २४ तासांत ९४८९ जण कोरोनातून बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण १०६२१२२० जण कोरोनातून पूर्ण बरे झाले आहेत. मात्र सध्या देशात १३९६३७ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. देशात आतापर्यंत ८२८५२९ जणांना लस देण्यात आली आहे. लसीकरण मोहीमेत भारताने अमेरिका, ब्रिटनला मागे टाकले आहे.