लखीमपुर: अंत्योदय रेशनकार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांना रास्त धान्य दुकानांमध्ये साखर वितरण केले जाणार आहे. तीन महिन्यांसाठीच्या साखरेचा कोटा उपलब्ध झाला आहे.
दर महिन्याला एक किलो यानुसार तीन महिन्यासाठीची तीन किलो साखर मार्च महिन्यात रेशनकार्ड धारकांना दिले जाईल. पाच मार्चपासून याचे वितरण केले जाणार आहे. यासाठी ग्राहकांना १८ रुपये प्रति किलो असा दर निश्चित करण्यात आला आहे. होळीच्या सणापूर्वी साखर मिळणार असल्याने सणाचा गोडवा आणखी वाढणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी विजय प्रताप सिंह यांनी सांगितले की, अंत्योदय रेशनकार्डधारक रास्त धान्य दुकानांमधून मार्च महिन्यात साखर घेऊ शकतात. त्यासाठीचा कोटा उपलब्ध झाला आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांची ही साखर मिळेल. जानेवारी महिन्यापासून मार्च पर्यंत प्रति रेशनकार्डधारक एक किलो साखर दरमहा अशी तीन किलो साखर मिळेल. साखरेच्या वितरणावेळी रेशन दुकानांमध्ये दक्षता पथकांचे अधिकारी उपस्थित राहतील. त्यामुळे रेशन वितरणातील घोटाळे टाळता येणार आहेत. रेशनकार्डधारकांना आपल्या नेहमीच्या दुकानांमध्ये जाऊन साखर घ्यावी लागणार आहे. इतर धान्य वितरणासाठी उपलब्ध असलेली पोर्टेब्लिटी सुविधा यासाठी देण्यात आलेली नाही असे पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.