बँकॉक : उसाची लागवड करण्यासाठी शेतकरी आपल्या शेतातील पाचट जाळून टाकत आहेत. त्यामुळे थायलंडमधील उत्तर आणि उत्तर-पूर्व भागात प्रदूषित धूराचे प्रमाण वाढले आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने सांगितले की, १८ प्रांतामधील अल्ट्रा-फाइन पीएम २.५.५ प्रदूषणाचा स्तर मर्यादेपेक्षा अधिक झाला आहे.
अनेक शेतकरी आपला वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी ऊस तोडणीपूर्वीच ऊसाचा पाला जाळतात. त्यामुळे प्रदूषण अनेक पटींनी वाढते. हे प्रदूषण कमी करण्यासाठी वायू प्रदूषण निराकरण केंद्र, ऊस कारखानदार आणि ऊस उत्पादकांनी उसाचा पाला जाळण्याविरोधातील मोहीम सुरू केली आहे.
प्रदषण नियंत्रण विभागाचे महासंचालक आणि वायू प्रदूषण निराकरण केंद्राचे प्रमुख अतापो चारोचेंसा यांनी सांगितले की, ऊस तोडणीसाठीच्या हार्वेस्टर यंत्राचा दर वाढल्याने सामांन्य ऊस उत्पादक शेतकरी तोडणीपूर्वी आपल्या शेतातील ऊस जाळण्याशिवाय पर्याय राहात नाही. मात्र, सरकारने ऊसामुळे होणाऱ्या प्रदूषणाविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत देशातील ५८ साखर कारखाने या मोहिमेत सहभागी झाले आहेत. त्याच्यावर कार्यवाही सुरू केली आहे.