नजीबाबाद : सरकारने गेल्या तीन वर्षांपासून ऊसाच्या दरात न केलेली वाढ आणि साखर कारखान्याकडून ऊसाचे पैसे मिळण्यास होत असलेला उशीर याविरोधात आझाद किसान युनीयनने तहलीस कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उप जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
राष्ट्रीय उपाध्यक्ष विरेंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली आझाद किसान युनीयनचे पदाधिकारी आणि शेतकरी सोमवारी तहसील कार्यालयासमोर एकत्र आले. गेल्या तीन वर्षांपासून उसाचे दर न वाढवल्याबद्दल विरेंद्र सिंह यांनी संताप व्यक्त केला. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत चर्चा करून सरकारविरोधात धरणे आंदोलन करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन उप जिल्हाधिकारी बृजेश सिंह यांना देऊन उसाचे दर वाढवावेत, चौदा दिवसांत उसाचे पैसे द्यावेत, शेतकऱ्यांना वेळेवर तोडणी पावती मिळावी अशा मागण्या करण्यात आल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज सिंह चौधरी, युवा जिल्हाध्यक्ष गुरजीत सिंह, संजीव राठी, सुभाष काकरान, सुधीर भडाना, हाजी जुल्फकार, राहुल पंडित, अहमद बंटी, सुभाष सिंह, रणवीर सिंह आदी उपस्थित होते.