अंबाला : फेब्रुवारी अखेरपर्यंत थकीत पैसे मिळाले नाहीत तर ८ मार्चपासून नारायणगढ साखर कारखान्याला ऊस पाठविणे बंद करण्याचा इशारा ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दिला आहे. जर ऊस आला नाही तर प्रशासनाला १० मार्चपासून कारखाना बंद करावा लागेल. नारायणगढमध्ये आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
भारतीय किसान युनीनयनच्या (चारुनी) झेंड्याखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर एकत्र येऊन घोषणाबाजी केली. यावेळी मागण्या मांगण्यात आल्या. याप्रश्नी १० मार्च रोजी महापंचायत आयोजित करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. कारखान्याकडून ५००० हून अधिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या थकीत बिलांची प्रतीक्षा आहे.
बीकेयूचे (चारुनी) प्रवक्ते राजीव शर्मा म्हणाले, या हंगामात आतापर्यंत जवळपास १२४ कोटी रुपयांचा ऊस साखर कारखान्याला मिळाला आहे. आणि अद्याप कारखान्याकडे १०१ कोटी रुपयांची थकबाकी आहे. याशिवाय गेल्या गळीत हंगामातील सुमारे ९ कोटी रुपयांचे धनादेशही अद्याप प्रलंबित आहेत. जिल्हा बिकेयूचे प्रमुख मलकीत सिंह म्हणाले, गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात कारखान्याचे गाळप सुरू झाले. निकषानुसार चौदा दिवसांमध्ये ऊस उत्पादकाला पैसे मिळणे आवश्यक आहे. मात्र, आतापर्यंत फक्त १६ डिसेंबरपर्यंतचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले आहेत.
नारायणगढच्या उपजिल्हाधिकारी वैशाली शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, जिल्हा प्रशासनाने १६ डिसेंबरपरयंत २४ कोटी रुपयांची थकबाकी दिली आहे. कारखान्याकडे अद्याप ३९ कोटी रुपयांची साखर शिल्लक आहे. मात्र, साखर विक्रीस सध्या बाजारात प्रतिकूल स्थिती आहे. त्यामुळे शिल्लक साखर साठा विक्रीस उशीर होत आहे. कारखान्याने थकबाकी देण्यासाठी २५ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला आहे. कारखान्याचे गाळप बंद पाडल्याने मार्ग निघणार नाही