गाळप हंगाम 2020-21: कोल्हापूर विभागातील साखर कारखाने बंद होण्याच्या मार्गावर

पुणे : राज्यातील साखर कारखान्यांनी आपला गाळप हंगाम आटोपता घेण्यास सुरुवात केली आहे. सोलापूर आणि कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी आपले गाळप बंद करण्यास सुरुवात केली आहे.

साखर आयुक्तालयाकडील अहवालानुसार, २७ फेब्रुवारी २०२१ पर्यंत सोलापूर विभागातील ८ साखर कारखान्यांचे गाळप संपुष्टात आले आहे. तर कोल्हापूर विभागात १ साखर कारखाना बंद झाला आहे. महाराष्ट्रात एकूण ९ साखर कारखाने आतापर्यंत बंद झाले आहेत.

या गळीत हंगामात कोल्हापूर विभागात ३७ साखर कारखान्यांनी सहभाग घेतला. सोलापूर विभागात २७ फेब्रुवारीअखेपर्यंत सर्वाधिक ४१ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे.

साखर आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, २७ फेब्रुवारीपर्यंत १८७ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग घेतला. राज्यात ८१८.४८ लाख टन उसाचे गाळप झाले असून ८३९.८१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.२६ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here