नवी दिल्ली : कोरोना विषाणू विरोधी लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. गेले तीन दिवस लसीकरण सुरू आहे. मात्र, गेल्या २४ तासांत नवे १४९८९ रुग्ण आढळून आले आहेत.
याशिवाय गेल्या दिवसभरात कोरोना व्हायरसमुळे ९८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १३ हजार १२३ लोक कोरोनापासून बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सद्यस्थितीत देशभरात कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या १,११,३९,५१६ झाली आहे. कोरोनाच्या सध्याच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १,७०,१२६ आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशभरात १,५७,३४६ जणांचा बळी गेला आहे. याशिवाय १,०८,१२,०४४ लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. देशभरात लसीकरण मोहीमेने गती घेतली आहे. आतापर्यंत १,५६,२०,७४९ जणांना लस देण्यात आली आहे.