नवी दिल्ली : जगभरात कोविड १९ चे नवे प्रकार आढळून येऊ लागल्याने धास्ती वाढली आहे. आता ब्राझीलमध्ये सापडलेल्या कोरोनाच्या नव्या रुपामुळे स्थिती अधिकच गंभीर बनली आहे. यापूर्वी कोविड-१९ मधून बरे झालेल्या रुग्णांवर पी १ या नव्या प्रकाराच्या विषाणूचा फैलाव झाल्याने दररोज एक हजारहून अधिक लोकांना मृत्यूमुखी पडावे लागत आहे.
ब्राझीलमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराने स्थिती गंभीर झाली आहे. पी – १, २ या प्रकारमुळे रुग्णांचा मृत्यूदर वाढला आहे. विषाणूचे हे परिवर्तीत रुप आधीपेक्षा जास्त धोकादायक आहे. या प्रकारातील बहुसंख्य रुग्णांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. ब्राझिलमधील मॅनाउस या शहरात याचा फैलाव अधिक झाला आहे. यापूर्वी तज्ज्ञांनी या शहरातील लोकांची प्रतिकारशक्ती अधिक असल्याचे म्हटले होते. जगातील सर्वात चांगली प्रतिकारशक्ती येथील लोकांमध्ये असल्याचे संशोधकांनी सांगितले होते. मात्र, त्यांचे अनुमान खोटे ठरले आहे. आणखी दोन आठवड्यात येथे दफनभूमीही अपुरी पडेल अशी स्थिती आहे.
पी १,२ या कोरोनाच्या नव्या प्रकाराला ब्रिटनमध्ये व्हीयूआय – २०२०१२/०१ या नावाने ओळखले जाते. हे म्युटेशन अधिक खरतनाक असल्याचे तेथील संशोधकांचे मत आहे. कॅलिफोर्निया याचे नाव बी. १.४२७/बी.१.४२९ असून दक्षिण आफ्रीकेत या विषाणूला एन ५०१वाय या नावाने ओळखले जात आहे. ब्राझीलमध्ये या पी १ विषाणूचा फैलाव अमेजोनासची राजधानी मॅनाउसपासून झाली आहे.
यापूर्वी मार्च २०२० मध्ये येथे कोविड १९ चा फैलाव झाला. त्यावेळीही मॅनाउस- अमेजोनासला मोठा फटका बसला. ब्राझीलमध्ये हा परिसरच कोरोनाचा केंद्रबिंदू होता. त्यानंतर येथे दुसरी लाट येणार नाही असे संशोधकांचे म्हणणे होते. सप्टेंबर २०२० मध्ये ऑक्सफर्डमधील संशोधकांना येथील ७६ टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचे आढळले होते.
कोरोनाचा फैलाव कमी झाल्याचे लक्षात येताच येथे दुकाने, मॉल, रेस्टराँ पुन्हा सुरू करण्यात आले. मात्र, नोव्हेंबर २०२० मध्ये दुसऱ्यांचा विषाणूचा फैलाव झाला. मात्र, सध्याची स्थिती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. २०२० मध्ये कोरोनामुळे जेवढ्या लोकांचा मृत्यू झाला, त्यापेक्षा अधिक लोकांना नव्या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यातच मृत्यूला सामोरे जावे लागले आह. दवाखान्यांमध्ये उपचारासाठी रुग्णांना जागा नसल्याची स्थिती सध्या आहे. ब्राझीलच्या हेल्थ इंटेलिजन्स लॅबचे संचालक डोमिनगो अस्वेस यांनी मार्च महिन्यात दफनासाठीही जागा शिल्लक नसेल अशी भीती व्यक्त केली आहे.
पी १ चा फैलाव आणखी २४ देशात झाल्याचे सांगण्यात येते. विषाणूचा हा प्रकार कोरोना झालेल्या १०० पेशंटपैकी ६१ लोकांना संक्रमित करू शकतो. यापूर्वीच्या संक्रमणात तयार झालेल्या अँटिबॉडीज यापुढे निष्क्रीय होतात असे संशोधकांचे मत आहे. तसेच काही रुग्णांमध्ये एक्स्ट्राजेनका आणि चायनिज व्हॅक्सिनचे डोसही निष्क्रिय झाल्याचे दिसले आहे. हा विषाणू इतरांच्या तुलनेत अधिक संक्रमक आणि संहारक असल्याचे संशोधकांनी सांगितले.