बेगुसराय : मगध शुगर अँड एनर्जी लिमिटेडने ऊस गाळप बंद केले आहे. कारखान्याने या हंगामात ५२ लाख ९६ हजार क्विंटल उसाचे गाळप केल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी उपाध्यक्ष शंभू प्रसाद राय यांनी दिली. कारखान्याने एक फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बिलापोटी ९८ कोटी २६ लाख रुपये दिले आहेत.
उपाध्यक्ष राय म्हणाले, सरकारने उसाचा दर ५ रुपये क्विंटल वाढवलाहे. त्यासह ऊस बिले दिली जात आहेत. हिवाळी हंगामातील रोप लावणीअंतर्गत आतापर्यंत १५ हजार एकर ऊस लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी ३० मार्चपर्यंत ऊस लागवड करून उसामध्ये १ किलो प्रति एकर ट्रायकोडर्मा वापरावा. शेतकऱ्यांना बियाणे, औषधे कारखान्याकडून दिली जात आहेत. आगामी हंगामात कारखान्याने ८५ लाख क्विंटल गाळपाचे उद्दीष्ट ठेवले असल्याची माहिती उपाध्यक्ष राय यांनी दिली.