बेतिया : गेली २५ वर्षे बंद असलेल्या चनपटिया साखर कारखान्याचा प्रश्न स्थानिक खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जयस्वाल यांनी लोकसभेत उपस्थित केला. शून्य प्रहरात खासदारांनी हा प्रश्न उपस्थित करताना प्रयागराज हायकोर्टात प्रलंबित असलेल्या या प्रकरणाबाबत निर्णय घेण्याची मागणी केली.
खासदार डॉ. जयस्वाल म्हणाले, चनपटिया साखर कारखाना ब्रिटिश इंडिया कंपनीचा होता. नंतर त्याची मालकी मिनिस्ट्री ऑफ टेक्स्टाइलकडे आली. कारखान्याची स्थित अतिशय खराब असल्याने त्याच्या खासगीकरण झाले. मात्र, ज्यांनी कारखाना चालविण्याची जबाबदारी घेतली, त्यांनी तेथील जमिन विक्री सुरू केली. बिहार सरकारने यावर आक्षेप घेतल्याने हे प्रकरण प्रयागराज हायकोर्टात पोहोचले. आता या प्रकरणात स्पेशल अपिल करण्यात आले आहे.
सरकारने हे प्रकरण संपुष्टात आणून कारखाना पु्न्हा सुरू करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी खासदारांनी केली. खासदारांच्या या मागणीबाबत शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. चनपटिया साखर कारखान्याची स्थापना १९३२ मध्ये झाली होती. बिहारमधील हा सर्वात जुना कारखाना आहे. १९९० पासून कारखान्याची दुरवस्था सुरू झाली. १९९४ ला कारखान्याला कुलूप लागले. १९९८ मध्ये सहकाराच्या माध्यमातून कारखाना सुरू करण्याचे प्रयत्न झाले. मात्र, ते १९९८ मध्ये असफल ठरले. गेली २५ वर्षे कारखाना बंद असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. कारखान्याकडे दोनशे एकर जमीन आहे.