रीगा : रीगा साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीसाठी जनाधिकार पार्टीच्यावतीने सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाच्या दरम्यान, राष्ट्रीय अध्यक्ष राजेश रौशन उर्फ पप्पू यादव यांनी प्रयत्नांची घोषणा केली आहे.
दोन दिवसांपासून आमचे सहकारी उपोषणाला बसले आहेत. त्यामध्ये फक्त २५ लोक आहेत, जे आमच्या पक्षाचेच आहेत. ही लढाई ४० हजार शेतकरी आणि ७०० कामगारांची आहे. ते लोक कोठे आहेत असा सवाल यादव यांनी केला.
ही लढाई फक्त जन अधिकार पार्टीच्या कार्यकर्त्यांची नाही. बिहारची भूमी महात्मा गौतम बुद्ध, गुरु गोविंद सिंह, माता सीता, विश्वामित्र, सम्राच अशोक यांची आहे. त्यांनी जगाला मार्गदर्शन केले. मात्र, आज बिहारची भूमी क्रांतीपासून दूर गेली आहे. सत्ताधारी पक्षासह विरोधकही मृतवत झाले आहेत अशी टीका यादव यांनी केली. राष्ट्रीय जनता दलही जनहिताच्या प्रश्नांपासून पळ काढत असल्याची टीका त्यांनी केली.
रिगा येथील शेतकरी भवनात पप्पू यादव म्हणाले, डिझेल, पेट्रोलच्या टॅक्समधून सरकारकडे २४ हजार कोटी रुपये जमा झाले. ते पैसे कोठे गेले याचा विचार करायला पाहिजे. हे पैसे बंगाल निवडणूक अथवा पक्षाची कार्यलये तयार करायला वापरली गेले का असा खोचक सवाल त्यांनी केला.
यादव यांच्या आग्रहानंतर उपोषणाला बसलेल्यांना ज्युस देऊन उपोषण समाप्त करण्यात आले. २६ मार्च रोजी बिहार बंदची घोषणा त्यांनी केली. यावेळी प्रदेश अध्यक्ष राघवेंद्र सिंह कुशवाहा, प्रदेश महासचिव महेंद्र सिंह यादव, दिलीप खिरहर, अभिजीत सिंह, प्रकाश झा, अवध किशोर यादव, रवि शंकर यादव, सरिता यादव, महिला विभागाच्या जिलाध्यक्ष सरिता देवी, सोनिया देवी, कामेश्वर सिंह, राजेश सिंह, गुलाब कुमारी व प्रवीण यादव आदींची भाषणे झाली.