शांघाई : साखर तस्करी करुन देशाचे २०० मिलियन युआनहून (३१ यूएस मिलियन डॉलर) अधिक कर रक्कमेचे नुकसान केल्याप्रकरणी एकोणीस जणांना तीन ते १५ वर्षे कैदेची शिक्षा सुनावण्यात आली. शांघाई नंबर ३ इंटरमीडिएट पीप्युल्स कोर्टाने हा निकाल दिला.
या सर्वांवर ३००,००० युआनपासून ३१ मिलियन युआनचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर चार प्रमुख गुन्हेगारांना आगामी तीन वर्षांपर्यंत राजकीय अधिकारापासून वंचित करण्यात आले आहे.
साखर तस्करी प्रकरणाचा तपास जानेवारी २०१९ पासून सुरू करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य आरोपींनी काही जहाज खरेदी करून भाड्याने घेण्यासाठी करार केले होते. वेगवेगळ्या लोकांकडे वेगवेगळी कामे देण्यात आली होती. अवैध पद्धतीने साखर आयात करणे, लोडिंग, अनलोडिंग आणि कामगारांचा पगार देणे अशा कामांचा यात समावेश होता. या प्रकरणातील पहिल्या संशयिताला मे महिन्यात अटक करण्यात आली होती.