थकीत ऊस बिलांचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा

रामपूर : ऊस विभागाशी संबंधित अधिकारी आणि विविध साखर कारखान्यांच्या व्यवस्थापकांसोबत ऊस समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी रविंद्र कुमार मादंड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत थकीत ऊस बिलांचा आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून केली जाणारी उसाची पेरणी तसेच साखर कारखान्यांद्वारे खरेदी केलेल्या उसाची आणि त्यांच्या बिलांची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली. साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांना ऊस बिले देण्यास टाळाटाळ करू नये असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यांनी साखर कारखान्यांकडून खरेदी केलेला ऊस, विक्री केलेली साखर, शिल्लक साखर यांसह कारखान्याची अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोतांची माहिती घेतली. बैठकीला जिल्हा ऊस अधिकारी हेमराज यांच्यासह जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांचे व्यवस्थापक, ऊस समितीचे सदस्य उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here