बिजनौर : उत्तर प्रदेशमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिशय आर्थिक अडचणीतून जावे लागत आहे. चालू गळीत हंगामात कारखान्यांनी शेतकऱ्यांना फक्त ५४ टक्के पैसे दिले आहेत. शेतकऱ्यांना वीज बिल, मुलांच्या शाळेची फी भरणेही मुश्किल झाले आहे. गाळप हंगाम अद्याप सुरू असून साखर कारखान्यांकडे एकूण ११००० कोटी रुपये थकीत आहेत.
ऊस विभागाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये ४० लाख ऊस उत्पादक शेतकरी आहेत. त्यांनी आपले पिक १२० साखर कारखान्यांना विकला आहे. यापैकी तीन कारखाने सरकारतर्फे चालविले जातात. तर २३ सहकारी समितींतर्फे चालविले जातात. उर्वरीत ९३ कारखाने खासगी आहेत.
शेतकऱ्याकडून ऊस खरेदी केल्यानंतर १४ दिवसांत त्यांना पैसे देणे बंधनकारक आहे. मात्र, हा नियम गेल्या अनेक वर्षांपासून पाळला जात नाही. आतापर्यंत शेतकऱ्यांना २६,९०६ कोटी रुपये कारखान्यांनी दिले आहेत. त्यापैकी २४,३७६ कोटी रुपये चौदा दिवसांपूर्वीचे आहेत.
चालू गळीत हंगामात शेतकऱ्यांना फक्त १३,३३४ कोटी रुपये देण्यात आले आहेत. ही रक्कम फक्त ५४.७ टक्के इतकी आहे. याशिवाय, ११,०४१ कोटी रुपये अद्याप थकीत आहेत.