कर्नाल : उसाच्या पिकावर टॉप बोरर किटकांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. ०२३८ या उसाच्या जातीवर याचा सर्वाधिक फटका बसला आहे. त्याची लावण सर्वात जास्त क्षेत्रावर करण्यात आली आहे.
कर्नालच्या ऊस विकास संस्थेच्या विभागीय केंद्रातील संशोधकांनी सांगितले की, सध्या ऊस तोडणीचा हंगाम संपत आला आहे. मात्र, आगामी कालावधीत किटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आधीच प्रयत्न करण्याची गरज आहे.
संशोधकांनी केलेल्या अभ्यासातून दिसून आले आहे की, हरियाणातील काही भागात याचा फैलाव अधिक झाला आहे. यामध्ये कर्नाल, पानीपत, सोनीपत, यमुनानगर आणि अंबालाचा समावेश आहे. किटकांनी उसाचे ४० ते ५० टक्के नुकसान केले आहे. उत्तर प्रदेशच्या पूर्व आणि पश्चिम भागात, बिहार आणि उत्तर भारताच्या इतर प्रदेशात ऊस पिकाचे ३० ते ४० टक्के नुकसान झाले आहे. परिसरात केलेल्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. किटकांच्या तपासणीसाठी शेतकऱ्यांना दिवसा शेतांमध्ये पाहणी करण्यास सांगितले आहे.