मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कोविडच्या टास्क फोर्सला लॉकडाउनच्या तयारीचे निर्देश दिले. राज्याच्या आरोग्य विभागाने तसेच राज्य सरकारच्या कोविड १९ टास्क फोर्सच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे यांनी कोरोना रोखण्यासाठी गतीने काम करण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले की, ज्या पद्धतीने कोविडच्या रुग्णांची संख्या वाढत आहे, महाराष्ट्रात लवकरच कोविडच्या रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये जागा कमी पडू शकते. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही ठाकरे यांना कोविडच्या रुग्णांची संख्या चिंताजनक असल्याचे सांगितले. लोक सूचनांचे गांभिर्याने पालन करत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. त्यामुळे लॉकडाउनसारख्या गंभीर उपायांचा विचार केल जाऊ शकतो असे ते म्हणाले.