पुणे : महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला आहे. साखर आयुक्तालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, २८ मार्च २०२१ अखेर राज्यात १८७ साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला. राज्यात ९५४.९१ लाख टन उसाचे गाळप झाले असून ९९७.१२ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४४ टक्के इतका आहे.
आतापर्यंत कोल्हापूर विभागात २० साखर कारखाने सुरू असून १७ बंद झाले आहेत. सर्वाधिक सोलापूर विभागात २८ मार्च २०२१ अखेर ४२ कारखान्यांनी गाळप केले होते. त्यापैकी आता ३३ कारखाने बंद झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६८ कारखाने बंद झाले आहेत.