व्याजासह ऊसाचे पैसे देण्याची सरकारकडे मागणी

शामली : भारतीय ऊस शेतकरी संघटनेची मेरठ रोडवरील कार्यालयात बैठक झाली. यावेळी ऊसाच्या थकीत रक्कमेसह शेतकऱ्यांच्या विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली. सरकारने शेतकऱ्यांची ऊस बिल थकबाकी व्याजासह द्यावी अशी मागणी करण्यात आली. जर याची कार्यवाही झाली नाही, तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला.

संघटनेचे अध्यक्ष अनिल मलिक म्हणाले, सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही. सरकार फक्त धनदांडग्यांचे हित बघते. उसाचे पैसे चौदा दिवसांत दिले जातील असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले. प्रत्यक्षात काही झालेच नाही. होळीपूर्वी साखर कारखान्यांनी पाच दिवसांचे पैसे दिले आहेत. मात्र, शेतकऱ्यांना त्यातही कमी पैसे मिळाले. शेतकऱ्यांना ऊस उत्पादनासाठी खूप खर्च येत आहे. तरीही गेल्या तीन गळीत हंगामात सरकारने दरात वाढ केलेली नाही. शेतकरी कृषी कायद्यांविरोधात आंदोलने करीत आहेत. आता ऊस बिले मिळविण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. जोपर्यंत पैसे देण्याची प्रक्रिया सुधारत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना बँकांची कर्जे आणि अन्य देण्यांबाबत दबाव आणला जाऊ नये. जर शेतकऱ्यांकडे पैसेच नसतील तर देणी फेडणार कशी असा सवाल यावेळी करण्यात आला.

यावेळी विनोद चौधरी, हरपाल सिंह, रणधीर सिंह, रघुवीर सिंह, विरेंद्र कुमार, सत्यपाल सिंह, रामपाल सिंह, देव कुमार आदी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here