अंबाला : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या थकीत बिलांसाठी अंबालातील बनौदी गावातील भारतीय किसान युनियनच्या (टिकैत) कार्यकर्त्यांनी नारायणगढ साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. यापूर्वी बिकेयूच्या चारुनी गटाने २०२० च्या हंगामातील सुमारे १०२ कोटींची थकबाकी लवकर मिळावी यासाठी कारखान्याच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. दरम्यान कारखाना प्रशासनाने आपली आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे सांगत पैसे देण्यास असमर्थता दर्शवली होती. यासाठीच्या कर्ज मागणीचा अर्ज हार्को बॅंकेने फेटाळला आहे असे सांगण्यात आले.
बिकेयूच्या (टिकैत) विभागाचे अध्यक्ष बलदेव सिंह म्हणाले, नियमानुसार कारखान्याने ऊस खरेदी केल्यानंतर चौदा दिवसांत पैसे देणे अपेक्षित आहे. मात्र नारायणगढ कारखाना पैसे देण्यास असमर्थ ठरला आहे. आम्हाला पैसे मिळवण्यासाठी वारंवार बैठका घ्याव्या लागतात. कारखान्याला इशारा द्यावा लागतो. कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी २० एप्रिलपर्यंत ३५ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. जर पैसे मिळाले नाहीत तर २२ एप्रिल रोजी महापंचायत आयोजित करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला