नवी दिल्ली : भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) देशाची राजधानी दिल्लीतील तापमान आगामी तीन दिवसांत हळूहळू ३७ डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढण्याचा इशारा दिला आहे.
एनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना आयएमडीचे संशोधक आणि विभागीय हवामान पूर्वानुमान केंद्राचे प्रमुख कुलदीप श्रीवास्तव म्हणाले की, दिल्लीमध्ये गेल्या तीन दिवसांपासून ४५ किलोमीटर प्रती तास गतीने वारे वाहात आहेत. त्यामुळे कडक उन्हाचा परिणाम दिसत आहे. ही स्थिती पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तर आणि पूर्व राजस्थानमध्ये पहायला मिळत आहे. नुकताच संपलेला २०२१या मार्च महिना गेल्या ११ वर्षातील सर्वाधिक उन्हाळ्याचा महिना होता.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत होळीच्या दिवशी ४०.१ डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गेल्या ७६ वर्षातील हा मार्च महिन्यातील सर्वाधिक उष्ण दिवस होता.