नवी दिल्ली : आयकर विभागाने २०२०-२१ या वर्षात २.३८ लाख करदात्यांना २.६२ लाख कोटी रुपये परतावा दिला आहे. यामध्ये व्यक्तिगत आयकर भरणाऱ्या २.३४ कोटी करदात्यांना ८७,७४९ कोटी रुपये मिळाले आहेत. तर कंपनी करदाता गटातील ३.४६ लाख प्रकरणांत १.७४ लाख कोटी रुपये परत मिळाले आहेत.
आयकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २०२०-२१ या वर्षात कर परताव्यात सुमारे ४३.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (सीबीडीटी) एक एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत २.३८ कोटीहून अधिक करदात्यांन २.६२ लाख कोटींहून अधिक रक्कम परत दिली आहे.
यापूर्व २०१९-२० मध्ये एकूण १.८३ लाख कोटी रुपये कर परतावा देण्यात आला होता. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, सरकारने कोरोना महामारीमुळे झालेले आर्थिक परिणाम कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यानुसार, सीबीडीटीने तातडीने आयकर परतावा जारी केला आहे.