पाटणा : राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी इथेनॉल उत्पादन, अन्न प्रक्रिया आणि राइस मिलसाठीच्या विविध प्लान्टसाठी २१६.९० कोटी रुपयांच्या आपल्या संयुक्त गुंतवणूक प्रस्तावांना मंजूरी दिली. तीन कंपन्यांना हा आर्थिक प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे.
मेसर्स मगध शुगर अँड एनर्जी लिमिटेडला (भारत शुगर मिल्सचा प्लान्ट) गोपालगंज जिल्ह्यात सिधवलिया तालुक्यात ७५ किलोलिटर उत्पादन क्षमतेच्या प्लान्टची स्थापना करण्यासाठी १३३.२५ कोटी रुपये गुंतवणूकीवर आर्थिक प्रोत्साहन अनुदान मिळेल. या प्लान्टची विस्तार क्षमता प्रतिदिन १०० किलो लीटर आहे.
कॅबिनेट सचिवालयाचे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितले की, राज्य मंत्रिमंडळाने विविध विभागांच्या ३५ प्रस्तावांना मंजुरी दिली आहे.