बरेली : ओसवाल साखर कारखान्यात रात्री ४२.५० लाख टन ऊस गाळप करण्यात आले. त्यानंतर कारखान्याचा गळीत हंगाम संपल्याची घोषणा प्रशासनाने केली. कारखाना प्रशासनाने शेतकऱ्यांना आपल्या शेतातील शिल्लक ऊस कारखान्याकडे लवकरात लवकर पाठवावा असे आवाहन केले आहे.
ओसवाल साखर कारखान्याने यावर्षी ४२.५० लाख टन उसाचे गाळप केले आहे. मात्र, सध्या कारखान्याकडे ऊस येत नाही. त्यामुळे रात्री कारखान्याने गाळप बंद केले. ओसवाल साखर कारखान्याचे ऊस विभागाचे महा व्यवस्थापक डॉ. चंद्रशेखर सिंह यांनी शेतकऱ्यांना शिल्लक ऊस पाठविण्याचे आवाहन केले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या शेतात ऊस आहे, त्यांनी लवकर तो पाठवावा, अन्यथा हंगाम समाप्त केला जाईल असे यावेळी सांगण्यात आले.