पुणे: महाराष्ट्रातील गाळप हंगामात मोठ्या संख्येने साखर कारखान्यांनी सहभाग नोंदवला. साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल २०२१ पर्यंत १८८ साखर कारखान्यांनी गाळप केले. राज्यात ९७२.३० लाख टन उसाचे गाळप करून १०१७.४२ लाख क्विंटल (१०१.७२ लाख टन) साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४६ टक्के इतका आहे.
सद्यस्थितीत कोल्हापूर विभागात ६ साखर कारखाने सुरू आहेत. आतापर्यंत ३१ कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर विभागात ४ एप्रिल २०२१ पर्यंत सर्वाधिक ४२ कारखान्यांनी गाळप केले. येथील सर्व कारखान्यांचा गाळप हंगाम पूर्ण झाला आहे. राज्यात आतापर्यंत १०८ साखर कारखाने बंद झाले आहेत.