भारतात कोरोनाची दुसरी लाट दररोज अधिक घातक होऊ लागली आहे. गेल्या २४ तासात कोरोना व्हायरसने संक्रमित १,६८,९१२ नवे रुग्ण आढळले आहेत. देशात आढळलेली ही संक्रमितांची सर्वाधिक संख्या आहे. यापूर्वी दहा एप्रिल रोजी १,५२,५६५ रुग्ण आढळले होते. गेल्या चोवीस तासात ९०४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. गेल्या सहा महिन्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या संख्येने कोरोना बळी गेले आहेत.
भारतात १,६८,९१२ नवे रुग्ण आढळल्यानंतर एकूण रुग्णसंख्या १,३५,२७,७१७ झाली आहे. ही संख्या अमेरिकेपेक्षा अधिक आहे. याबाबत भारताने आता ब्राझीलला मागे टाकले आहे. अमेरिकेत एकूण ३१,९१८,५९१ कोरोना रुग्ण आहेत. तर ब्राझीलमध्ये १३,४८२,५४२ रुग्ण आहेत.
भारतात ९०४ जणांचा मृत्यू आल्यानंतर आता कोरोना व्हायरसने झालेल्या मृत्यूंची संख्या १,७०,१७९ वर पोहोचली आहे. अमेरिकेत या आजाराने ५,७५,८२९ तर ब्राझीलमध्ये ३,५३,२९३ मृत्यू झाले आहेत. गेल्या २४ तासात ७५,०८६ जणांना घरी पाठविण्यात आले आहे. एकूण बरे झालेल्यांची संख्या १,२१,५६,५२९ झाली आहे. तर अॅक्टिव्ह रुग्ण वाढून १२,०१,००९ वर पोहोचली आहे. आतापर्यंत १०,४५,२८,५६५ लोकांना लस देण्यात आली आहे.
देशातील चार राज्यांत एका दिवसात सर्वाधिक रुग्ण मिळाले आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा यात समावेश आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच ६३,२९४ रुग्ण आढळले. तर राज्यात ३४९ जणांचा मृत्यू झाला. महाराष्ट्रात दिवसभरात ३४,००८ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत ३४.०७ लाख लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. यातील २७.८२ लाख लोक बरे झाले आहेत. तर ५७,९८७ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ५.६५ लाख लोकांवर उपचार सुरू आहेत.
इतर राज्यातही स्थिती गंभीर
दिल्लीत रविवारी १०,७७४ लोकांना कोरोना झाल्याचे आढळून आले. तर ५१५८ जण बरे झाले आहेत. दिवसभरात ४८ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत ७.२५ लाख लोक संक्रमित झाले असून यापैकी ६.७९ लाख लोक बरे झाले आहेत. तर ११,२८३ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३४,३४१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
उत्तर प्रदेशातही एका दिवसात १५,३५३ रुग्ण आढळले आहेत. तर २७६९ जण बरे झाले आहेत. दिवसभरात ६७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. राज्यात ६.९२ लाख लोक संक्रमित झाले असून त्यापैकी ६.११ लाख बरे झाले आहेत. एकूम ९,१५२ जणांचा मृत्यू झाला. सध्या ७१,२४१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गुजरातमध्ये रविवारी ५४६९ जण नव्याने संक्रमित झाले. तर २९७६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. एकूण ५४ जणांचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनाचे ३.४७ लाख रुग्ण आढळले असून ४८०० जणांचा मृ्त्यू झाला आहे. राज्यात सध्या २७,५६८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.