उसाचा दर साखरेच्या दरांशी जोडा : गोएल

नवी दिल्ली : चीनी मंडी साखर उद्योगातील अडचणींवर दीर्घकालीन तोडगा काढण्यासाठी सरकारने ऊस दर बाजारातील साखरेच्या दराशी जोडला पाहिजे, असे मत इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरव गोएल यांनी व्यक्त केले आहे. जर, ही मागणी सरकारने पूर्ण केली तर, उसाची थकबाकी हा विषयच उरणार नाही आणि साखर उद्योगाला सरकारकडे सातत्याने मदतही मागावी लागणार नाही, असे मतही गोएल यांनी व्यक्त केले आहे.

गोएल म्हणाले, ‘गेल्या वर्षी भारतात ३२५ लाख टन साखर उत्पादन झाले होते. त्या तुलनेत यंदाच्या हंगामात उत्पादन कमी होऊन ३१५ लाख टनपर्यंतच होणार आहे. भारताची देशांतर्गत बाजारातील मागणी २६० लाख टनच आहे. यावर्षी १ ऑक्टोबरला ओपनिंग स्टॉक १०७ लाख टन होता.’

केंद्र सरकारने या हंगामासाठी ५० लाख टन साखर निर्यातीचे टार्गेट दिले आहे. त्यातील १० लाख टन साखर निर्यातीचा करार झाला आहे. पण, आता जो साखर कारखाना निर्यात करणार नाही, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची वेळ आल्याचे मत गोएल यांनी व्यक्त केले आहे.

SOURCEChiniMandi

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here