मुंबई : पैशांच्या देवाण-घेवाणीची रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) सुविधा १८ एप्रिल रोजी १४ तासांसाठी खंडीत केली जाणार असल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) दिली आहे. १७ एप्रिल २०२० रोजी दैनंदिन कामकाज बंद झाल्यानंतर आरबीआयकडून आरटीजीएसचे तांत्रिक अपग्रेडेशन केले जाणार आहे. त्यामुळे आरटीजीएस सेवा रविवारी, १८ एप्रिल २०२१ रोजी रात्रीपासून चौदा तास बंद राहील.
यादरम्यान एनईएफटी सेवा नियमित सुरू राहील असे सूत्रांनी सांगितले. गेल्या आठवड्यात भारतीय रिझर्व्ब बँकेने कालबद्ध पद्धतीने नॉन बँक प्रणालीतील फर्म्सना आरटीजीएस आणि एनईएफटी सुविधा देण्याचा निर्णय जाहीर केला. नॉन बँकिंग सेक्टरला पैशाच्या देवाण-घेवाण व्यवहारात समाविष्ट करून घेण्याचा उद्देश या निर्णयामागे आहे.