औरंगाबाद : राज्यातील साखर हंगाम २०२०-२१ आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सोलापूर विभागातील सर्व कारखाने बंद झाले आहेत. इतर विभागातील कारखानेही बंद होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यात आतापर्यंत, १८ एप्रिल २०२१ अखेर १४६ साखर कारखाने बंद झाले आहेत.
जर औरंगाबाद विभागाकडे पाहिले तर या हंगामात एकूण २२ साखर कारखान्यांनी गाळप केले. त्यापैकी ८ कारखाने आतापरंत बंद झाले आहेत. औरंगाबाद विभागात एकूण ९६.१६ लाख टन उसाचे गाळप झाले असून ९२.७० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. आतापर्यंत विभागाचा साखर उतारा ९.६४ टक्के इतका आहे.
साखर आयुक्तालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, १८ एप्रिल २०२१ अखेर राज्यात १९० साखर कारखान्यांनी गाळप हंगामात सहभाग नोंदवला. राज्यात ९९८.३३ लाख टन उसाचे गाळप झाले असून १०४६.२० लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा १०.४८ टक्के इतका आहे.