नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटातही गेल्यावर्षीच्या तुलनेत, २०२०-२१ मध्ये कृषी आणि पूरक वस्तूंच्या निर्यातीत १८.४९ टक्क्यांची वाढ झाली आहे.
एप्रिल २०२० पासून फेब्रुवारी २०२१ यांदरम्यान कृषी आणि याच्याशी संबंधीत वस्तूंची निर्यात २.७४ लाख कोटी रुपये झाली. तर त्याआधीच्या वर्षात याच कालावधीत कृषी क्षेत्राशी संबंधीत वस्तूंची निर्यात २.३१ लाख कोटी रुपये होती. त्यामुळे निर्यातीत १८.४९ टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. सन २०१९-२० या दरम्यान कृषी वस्तूंची निर्यात २.५२ लाख कोटींची झाली होती तर आयात १.४७ लाख कोटींची होती. ज्या वस्तूंची निर्यात अधिक झाली, त्यामध्ये गहू, बासमती तांदूळ, सोयी मिल, मसाले, साखर, कापूस, भाजीपाला, अल्कोहोलिक पेयांचा समावेश आहे.
गहू आणि इतर धान्यांच्या निर्यातीत गेल्यावर्षीच्या तुलनेत जबरदस्त वाढ झाली आहे. गव्हाची निर्यात ४२५ कोटींवरून वाढून ३२८३ कोटी रुपयांवर गेली आहे. तर इतर धान्यांची आयात १३१८ कोटी रुपयांवरून ४४२ कोटी रुपये झाली आहे. अफगाणिस्तानला ५०,००० टन आणि लेबनानला ४०,००० टन गव्हाची निर्यात केली गेली. गव्हाच्या निर्यातीत ७२७ टक्क्यांची भरपूर वाढ झाली आहे.
अशाच पद्धतीने बासमती तांदूळ वगळता इतर निर्यात १३२ टक्क्यांची वाढ होईल. २०१९-२० मध्ये १३०३० कोटी रुपयांच्या नॉन बासमती तांदूळ निर्यात करण्यात आली. ती २०२०-२१ मध्ये वाढून ३०,२७७ कोटी रुपये झाली आहे. नव्या तांदळामुळे निर्यातीत वाढ झाली आहे. ब्राझिल, टायमर लेस्टी, पापुआ न्यू गिनी, चिली आदी प्रमुख बाजारात ही निर्यात झाली आहे. तर टोगो, सेनेगल, मलेशिया, मादागास्कर, इराक, बांगलादेश, व्हिएतनाम, मोझांबिक आदी देशांत तांदूळ निर्यात करण्यात आला.
सोया मीलच्या निर्यात १३२ टक्क्यांची वाढ झाली. २०१९-२० मध्ये याची निर्यात ३०८७ कोटी रुपये झाली होती. ती २०२०-२१ मध्ये ७२२४ कोटी रुपयांची झाली आहे. एप्रिल २०२० पासून फेब्रुवारी २०२१ यांदरम्यान मसाल्यांची निर्यात २६२५७ कोटी, साखरेची निर्यात १७०७२ कोटी, कापसाची ११,३७३ कोटी, ताज्या भाज्यांची निर्यात ४७८० रुपयांची झाली. यांदरम्यान कृषी वस्तूंची निर्यात १,४१,०३४.२५ कोटी रुपयांची आयात करण्यात आली.