बिजिंग : कृषी आणि ग्रामीण मंत्रालयाने एका उपक्रमांतर्गत संकलित केलेल्या अहवालानुसार, चीनमध्ये २०३० पर्यंत देशांतर्गत बाजारपेठेत १६.४४ मिलियनपर्यंत साखरेची मागणी पोहोचेल असा अंदाज आहे. तर २०२१-२०३० या काळात साखरेची आयात अपेक्षेप्रमाणे उच्चांकी स्तरावर पोहोचेल.
२०३० पर्यंत देशात साखरेचे एकूण उत्पादन ११.३५ मिलियन टनापर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. देशांतर्गत साखरेचे उत्पादन आणि मागणी यासोबतच देशांतर्गत आणि परदेशांतून साखरेच्या पुरवठ्यातील अंतर पाहता साखरेची आयात २०३० मध्ये ५.२ मिलियन टनापर्यंत पोहोचेल असा अंदाज चीनमध्ये वर्तविण्यात आला आहे. साखरेच्या आयातीचे प्रमाणे वार्षिक सरासरी ५.८ टक्क्यांनी वाढण्याचे अनुमान आहे.
रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, साखरेची उत्पादने आणि लोकांची आरोग्याबाबतची जागरूकता यामुळे साखरेचा देशातील खप वाढण्याचे प्रमाण २०२१-२०३० या कालावधीत सरासर ०.९ टक्के राहील अशी शक्यता आहे.