औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्याच्या इथेनॉल प्लांटमधून ऑक्सिजन निर्मितीची प्रक्रिया सुरू झाली आहे. याबाबत माध्यमांत प्रसिद्ध वृत्तानुसार, कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी सांगितले की, आम्ही इथेनॉल प्लांटमधून ऑक्सिजन उत्पादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. आगामी १० दिवसांत आम्ही या प्लांटमधून १० मेट्रिक टन मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करू शकतो.
ऑक्सिजन उत्पादनाचा हा प्रयोग यशस्वी झाला तर कोरोना महामारीने त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील साखर पट्ट्यात ऑक्सिजन निर्मिती केंद्र तयार होऊ शकतो. दररोज ६० किलो लीटर क्षमतेच्या इथेनॉल सयंत्रात ऑक्सिजन साठवून त्यावर प्रक्रिया करून दररोज २० मेट्रिक टन मेडिकल ग्रेड ऑक्सिजन उत्पादन करण्याची तयारी केली गेली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात दररोज एकूण १८ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर त्यातून जिल्ह्याची गरज भागू शकते.
ऑक्सिजनच्या मेडिकल ग्रेडबाबतच्या शुद्धीकरणाशी संबंधीत मॉलिक्यूल दिल्लीला पाठविण्यात आले आहेत. ते सोमवार पर्यंत येथे पोहोचतील. आम्ही ९३ ते ९५ टक्के मेडिकल ऑक्सिजन पुरवठा करू शकतो असा आम्हाला विश्वास वाटतो असे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले.
नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज लिमिटेडचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले की, इथेनॉल प्लांटमधून ऑक्सिजन निर्मितीचा प्रयोग सुरू करण्याचा निर्णय शुक्रवारी साखर कारखाना प्रशासनाच्या एका ऑनलाइन बैठकीत घेतला होता.