कोरोनामुळे सॅनिटायझरची मागणी वाढली, दौराला कारखान्यात दररोज पाच हजार लिटरचे उत्पादन

मेरठ : कोरोना महामारीचा वाढता फैलाव दिसू लागल्याने सॅनिटायझरची मागणीही वाढली आहे. मेरठ जिल्ह्यातील दौराला साखर कारखान्यात सॅनिटायझर बॉटलिंग प्लान्टची क्षमता ५००० लिटर प्रतिदिन आहे. मात्र, सध्या दुप्पट मागणी आहे. कोरोनाची पहिली लाट संथ झाल्याने मागणी ५०० लिटरवर आली होती. मात्र, आता यात २० पटींनी वाढ झाली असून १० हजार लिटरची मागणी आहे.

कारखान्यात ५०० मिली आणि एक लिटरच्या बाटल्यांत उत्पादन केले जाते. याशिवाय ५ लिटर ते ३५ लिटरचे कॅन आणि २०० लिटरच्या बॅरलमधूनही सॅनिटायझर दिले जात आहे. पूर्ण क्षमतेने उत्पादन सुरू असूनही मागणी पूर्ण केली जाऊ शकत नसल्याचे कारखाना प्रशासनाचे म्हणणे आहे.

परदेशांप्रमाणे गुजरातमध्येही सॅनिटायझरचे जादा उत्पादन होते. येथे आइसो प्रोपीन अल्कोहोलपासून सॅनिटायझर तयार केले जाते. गेल्यावर्षी कोरोना संक्रमणामुळे मागणीत मोठी वाढ झाली होती. त्यामुळे अनेक कारखान्यांनी याचे उत्पादन सुरू केले. राज्य सरकारनेही यासाठी परवाना दिला. जिल्ह्यात दौराला आणि मवाना यांच्याकडे सॅनिटायझर निर्मितीसाठी एक्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल वापराचा परवाना आहे. तर हापूडमधील ब्रजनाथपूर साखर कारखान्यालाही दररोज ८००० लिटर सॅनिटायझर निर्मितीचा परवाना देण्यात आला आहे. मात्र, यापैकी फक्त दौराला कारखाना सॅनिटायझर निर्मिती करत आहे. कारखान्याने केंद्र आणि राज्य सरकारलाही १०,००० लिटरहून अधिक सॅनिटायझर मोफत दिले आहे.

यापूर्वी सॅनिटायझर निर्मितीसाठी आयसोप्रोपिल अल्कोहोलचा वापर केला जात होता. मात्र कोरोनामुळे देशात आयसोप्रोपिल अल्कोहोल कमी झाले. त्याचा परिणाम सॅनिटायझर निर्मितीवरही झाला. त्यामुळे आता डिनेचर्ड इथाइल अल्कोहोलचा वापर केला जात आहे. हे इथेनॉल निर्मितीच्या पहिल्या टप्प्यातील अल्कोहोल आहे. जे उत्तर प्रदेशातील कारखान्यांकडे मुबलक उपलब्ध आहे.

काय म्हणतात अधिकारी
कारखान्याने गेल्यावर्षी सॅनिटायझर निर्मिती सुरू केली. कोरोनाच्या संथगतीमुळे मागणीही घटली होती. मात्र, आता कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मागणी वीस पट वाढली आहे. त्यामुळे प्लान्ट पूर्ण क्षमेतेने सुरू ठेवूनही मागणी पूर्ण करण्यास अडचणी येत आहेत असे दौराला कारखान्याचे केन महा व्यवस्थापक संजीव खाटियान यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here