हसनपूर : किसान सहकारी साखर कारखाना २८ एप्रिलपासून गाळप बंद करणार आहे. मात्र, जोपर्यंत शेतांमध्ये ऊस आहे, तोपर्यंत कारखाना सुरू ठेवावा. जर ऊस शिल्लक असताना कारखाना बंद केल्यास आंदोलनाचा इशारा भारतीय किसान संघाने दिला आहे.
साखर कारखाना प्रशासनाने उसाचा पुरवठा कमी झाल्याचे दाखविण्यासाठी २६ एप्रिल रोजी ऊस घेऊन आलेली वाहने बाहेर थांबविल्याचा आरोप भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष कृष्ण कुमार शर्मा यांनी केला. प्रशासनाला कारखाना २८ एप्रिल रोजी बंद करायचा आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यापासून याची तयारी सुरू करण्यात आली. २३ आणि २४ तारखेला शेतकऱ्यांना तोडणीच्या पावत्या दिल्या गेल्या नाहीत. त्यामुळे २५ एप्रिल रोजी सकाळी ऊस गाळपास उपलब्ध नसल्याची वेळ आली. २५ एप्रिलला शेतकऱ्यांना एकाचवेळी उर्वरीत पावत्या देण्यात आल्या. एकाचवेळी पाच-पाच पावत्या घेऊन ऊस तोडणी करणे, कारखान्याला पाठविणे शेतकऱ्यांसाठी अशक्य बाब आहे. २६ एप्रिल रोजी शेतकरी मोठ्या प्रमाणावर ऊस घेऊन आल्यानंतर टोकन देण्यापूर्वीच त्यांना थांबविण्यात आले. कारखाना परिसरात ऊस कमी झाल्याची स्थिती निर्माण करण्यात आली. जोपर्यंत शेतात ऊस आहे, तोपर्यंत कारखाना बंद करणे अयोग्य आहे. ऊस संपेपर्यंत कारखाना सुरू ठेवावा. दरम्यान, याबाबत कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी कोणतीच माहिती दिलेली नाही.