पाकिस्तानला ५०,००० टन साखरेच्या निविदेसाठी मिळाली ऑफर

हॅम्बर्ग : पाकिस्तानची ट्रेडिंगमधील राष्ट्रीय स्तरावरील संस्था ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ पाकिस्तानने (टीसीपी) ५०,००० टन साखर खरेदीसाठी जारी केलेली आंतरराष्ट्रीय निविदा मंगळवारी बंद झाली. प्रसारमाध्यमांतील वृत्तानुसार आंतरराष्ट्रीय निविदेत सर्वात कमी ४४७ डॉलर प्रतिटन दराची निविदा आली आहे.

जेमिनी ट्रेडिंग हाउसने सर्वात कमी दराची निविदा भरल्याने त्यांना ५०,००० टन साखर निर्यातीची संधी मिळू शकते. या प्रस्तावावर अद्याप विचार सुरू असून अंतिम निर्णय झालेला नाही.

प्रति टन डॉलरमध्ये निविदा दाखल करणाऱ्या अन्य प्रस्तावात सुक्दे ५५०.५० डॉलर, अल खलीज शुगर ५६१.५०, विल्मर ५६६.५०, ड्रेफस ५३५ आणि ईडी अँड एफ मॅन ५७९ डॉलर यांचा समावेश आहे. जुलै २०२० मध्ये पाकिस्तान सरकारने उत्पादनात झालेली घट आणि महागाई कमी करण्यासाठी साखरेच्या आयातीस मंजुरी दिली आहे. देशांतर्गत पुरवठ्यात सुधारणा करण्यासाठी अलिकडेच टीसीपीने आयात निविदा तातडीने जारी करण्यात आल्या.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here