सहारनपूर: लखनौती येथील शेरमऊ साखर कारखान्यातर्फे परिसरातील अनेक गावांत सॅनिटायझेशन मोहीम राबविण्यात आली.
कारखान्याचेय वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल शर्मा यांनी सांगितले की, कारखाना प्रशासनाने कोरोनापासून बचावासाठी सुरुवातीला कारखान्यात ही मोहीम राबवली. नंतर गावांमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले. प्रशासनाने शेरमऊ, कोटडा आदी गावांत सॅनिटायझेशन केले. याशिवाय कारखाना परिसर, केन यार्ड, कामगार वसाहतीतही मोहीम राबवली. सरकारच्या मोहीमेला कारखाना सहकार्य करणार असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
दरम्यान, नानौता येथे बृजेंद्र कुमार चौधरी यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांनी गंगोह देवबंद रस्त्यासह शहरातील विविध धार्मिक ठिकाणी, शिक्षण संस्था, सरकारी तसेच गैर सरकारी संस्था, गल्ल्यांमध्ये सफाई अभियान राबवले. गल्ल्यांमध्ये आणि घरांमध्ये सॅनिटायझेशन करण्यात आले. हे अभियान असेच सुरू ठेवण्यात येणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले. नागरिकांनी स्वच्छता राखावी असे आवाहन करण्यात आले. नगराध्यक्ष नसीम फात्मा यांचे प्रतिनिधी सर्फराज अख्तर मुन्ना यांनी लोकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले.