कोरोनाविरोधातील लढाईसाठी आरबीआयची मदत, जाहीर केली उपाययोजना

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेकडून रेपो रेटवर ५०,००० कोटी रुपयांची ऑन टॉप लिक्विडिटी देण्यात येत असल्याची घोषणा गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी केली. या स्कीमअंतर्गत बँका व्हॅक्सिन बनविणाऱ्या कंपन्या, वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटल्स, रुग्णांसाठी लिक्विडीटी उपलब्ध करून देऊ शकतील. कोविड १९ची दुसरी लाट अतिशय वेगाने पसरल्याने व्यापक पावले उचलण्याची गरज असल्याचे गव्हर्नर म्हणाले.

गव्हर्नर दास म्हणाले, रिझर्व्ह हँक कोविड १९च्या परिस्थितीतून देशाला सावरण्यासाठी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. केंद्रीय बँक कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसलेल्या नागरिक, व्यावसायिक आणि संस्थांना मदतीसाठी प्रयत्न करेल. कोविड मुळे व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे अनेक उद्योजक आगामी काळात आपला व्यवसाय पुढे कसा न्यावा यासाठी प्रयत्न करीत आहेत. नव्या पद्धती पडताळत आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत सुविधांचा वापर वाढला आहे. विजेचा वापर वाढला आहे. भारतीय रेल्वेच्या माल वाहतुक दरातही वाढ झाली आहे. एप्रिलमध्ये पर्चेसिंग मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स (पीएमआय) ५५.५ वर पोहोचला. मार्चपासून त्यात वाढ झाली आहे. फेब्रुवारीत कमी असलेला कन्झ्युमर प्राइस इंडेक्स (सीपीआय) मार्चमध्ये ५.५ टक्क्यांवर पोहोचला.

कोरोनामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याने गरजेच्या वस्तू महागल्याचे गव्हर्नर दास म्हणाले. भारतातील एक्स्पोर्ट मार्चमध्ये खूप वाढला. एप्रिलमध्येही निर्यातीत गतीने वाढ झाल्याचे सरकारी आकडेवारीवरून दिसते. शेअर बाजाराकडून सरकारी सिक्युरिटीजला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आरबीआय फायदा मिळविण्यासाठी ही प्रक्रिया गतीमान करण्याच्या प्रयत्नात आहे. यंदा मॉन्सून चांगला राहणार असल्याने महागाई दर घटण्याची स्थिती असल्याचे दास यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here